नगर प्रतिनिधी. (04.नोव्हेंबर.2026.) : अहिल्यानगरमधील MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या बहुचर्चित बनावट चलनी नोटा आणि पैशांचा पाऊस प्रकरणातील आरोपीचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला असून, न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.न्यायालयात आरोपींच्या वतीने ॲड.महेश तवले,ॲड.संजय दुशिंग आणि ॲड.सतीश गीते यांनी कामकाज पाहिले.
दिनांक २९ सप्टेंबर २०२६ रोजी MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील विनायक कॉलनी, वडगाव रोड परिसरातील एका खोलीत स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकला होता. भारतीय चलणासारख्या हुबेहूब दिसणाऱ्या बनावट नोटा खऱ्या भासवून, स्वतःच्या फायद्यासाठी व्यवहारात वापरून लोकांची फसवणूक केली जात असल्याचा संशय होता.
या कारवाई दरम्यान, गणेश शेवाळे यांनी भाड्याने घेतलेली खोली आणि त्यांच्या मालकीच्या फॉक्सवॅगन (Force Wagon) गाडीतून १८,४१९ रुपयांच्या बनावट चलनी नोटा, नोटा छपाईसाठी लागणारे कोरे बंडल, मोबाईल व इतर असा एकूण १,०२,०९,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. या प्रकरणी सुमित चंदनशिवे आणि सूरज कांबळे यांना अटक करण्यात आली होती, तर प्रियांका बंडगर यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.
न्यायालयात आरोपीच्या वतीने बाजू मांडताना जोरदार युक्तिवाद करण्यात आला की, "सदर नोटा आम्ही छापत नाहीत, बाजारात कुठेही त्यांचा वापर केलेला नाही आणि कोणाचीही फसवणूक केलेली नाही. फिर्यादीत नमूद केलेली कलमे आम्हाला लागू होत नाहीत." हा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने दिलासादायक निर्णय दिला.
आरोपीच्यावतीने ॲड.महेश तवले,ॲड.संजय दुशिंग आणि ॲड.सतीश गिते यांनी काम पाहिले. त्यांना ॲड.आश्विनी गिते,ॲड.पायल जाधव,ॲड.माधुरी नाणेकर आणि ॲड.कोमल साळवे, ॲड.अनिकेत जाधव,ॲड.संजय वालेकर,ॲड.निलेश देशमुख,ॲड.अक्षय हुलगे,ॲड.प्रणव ठोंबरे,ॲड.विशाल काळे, ॲड.निळकंठ सावंत,ॲड.सचिन गायकवाड,ॲड.अमर निमसे,ॲड.प्रतीक सुपेकर,ॲड.सागर घाटे आणि ऑफिस मदतनीस योगेश दुर्गे यांनी सहकार्य केले.

