कर्तृत्ववान मराठा नवदुर्गा महिलांचा पुण्यात होणार राज्यस्तरीय सन्मान सोहळा..

Ahmednagar Breaking News
0

‘कर्तृत्ववान मराठा नवदुर्गा’ पुरस्कार सोहळा १ नोव्हेंबरला; विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा होणार गौरव..

पुणे, प्रतिनिधी. (29.ऑक्टोबर.2026.) : समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करून सामाजिक जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या मराठा समाजातील कर्तृत्ववान महिलांचा राज्यस्तरीय सन्मान सोहळा रविवार, दि. १ नोव्हेंबर रोजी पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. अखंड मराठा साम्राज्य फाउंडेशन (ट्रस्ट) यांच्या वतीने ‘कर्तृत्ववान मराठा नवदुर्गा – राज्यस्तरीय सन्मान सोहळा २०२६’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. औंधगाव येथील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी कलामंदिर येथे सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत हा सोहळा संपन्न होणार आहे. समाजसेवा, शिक्षण, आरोग्य, उद्योग-व्यवसाय, कला-संस्कृती, क्रीडा, कृषी व ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण तसेच सार्वजनिक आणि प्रशासकीय क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे.

स्त्रीशक्तीचा जागर; कर्तृत्ववान महिलांना प्रेरणादायी व्यासपीठ.

या सोहळ्यास महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर, पुणे गुन्हे शाखेच्या आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते, समाजसेविका डॉ. ज्योतीताई विनायकराव मेटे आणि मुंबईच्या महापौर ऋतुजाताई राजेश तावडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ‘स्त्रीशक्तीचा जागर… कर्तृत्वाचा गौरव!’ या संकल्पनेतून आयोजित या सोहळ्याचा उद्देश महिलांच्या सामाजिक योगदानाची दखल घेऊन त्यांच्या कार्याचा गौरव करणे आणि इतर महिलांना समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा देणे हा आहे. महिलांचे कर्तृत्व हे समाजाच्या प्रगतीचे महत्त्वपूर्ण बळ असून, निःस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या महिलांना सन्मानित करून त्यांच्या कार्याला व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात येत आहे. कार्यक्रमाला नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन फाउंडेशनचे संचालक मनोज सोनवणे (मो. ७५८८००४५५१) यांनी केले आहे. 

अधिक माहितीसाठी संदीप नवसुपे (मो. ९४२२९६४०३५) यांच्याशी संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top