शासकीय कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणल्याचा आरोप असलेल्या आरोपीची निर्दोष मुक्तता..
नगर, प्रतिनिधी. (21.ऑक्टोबर.2026.) : शासकीय कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणल्याचा तसेच बेकायदेशीर मुरूम उत्खनन व वाहतूक केल्याचा आरोप असलेल्या आरोपीची अतिरिक्त सत्र न्यायालय अहिल्यानगर यांनी आरोपी दत्तात्रय उर्फ देवराज दिलीप भालसिंग यांची निर्दोष मुक्तता केली.मा.अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री.राजेश एम तायडे यांनी दिनांक 17 ऑक्टोबर 2026 रोजी हा निकाल दिला.
न्यायालयात सुनावणी दरम्यान अभियोजन पक्षाला आरोपी विरुद्धचे आरोप वाजवी संशयापलीकडे सिद्ध करता आले नाहीत. साक्षीदारांच्या जबाबातील त्रुटी,आरोपीची ओळख पटविण्याबाबतची कमतरता आणि जप्ती पंचनाम्या बाबत निर्माण झालेली शंका या बाबी विचारात घेऊन न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली.
आरोपीच्या वतीने ॲड.महेश तवले व ॲड.संजय दुशिंग यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. तसेच त्यांना मदत करणारे ऍड अनिकेत जाधव ऍड किरण रायकर ॲड अमर निमसे ॲड प्रतीक सुपेकर एड निळकंठ सावंत ऍड विशाल काळे ऍड सचिन गायकवाड ऍड देवांश धोकरीया आणि सहकारी योगेश दुर्गे यांनी सहकार्य केले.
